Tuesday, August 11, 2015

हिरवी चटणी- हिरवी मिरची लसूण ठेचा

हिरवी मिरची लसूण ठेचा/चटणी

साहित्य: २-4 लवंगी मिरच्या (कमी तिखट सुद्धा वापरू शकता), ८-१० ताज्या लसणाच्या पाकळ्या. मीठ व लिंबू.

कृती: प्रथम मिरच्या धुवून, लसूण सोलून, व १ लिंबाचा रस काढून ठेवावा.

हि चटणी किंवा ठेचा माझ्या मते पाट्यावर वाटला तरच सुरेख होतो. तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही एखादा मोठा व एक लहान दगडही वापरू शकता (परंतु तो आधी स्वच्छ धुवून घ्या.) मिक्सर वापरू नका अन्यथा अपेक्षित चव येणार नाही. 

मिरची व लसूण एकत्र साधारण ३ मिनिटे वाटून घेऊन त्यात लिंबाचा रस व मीठ चवीनुसार घालावे.  आणी अप्रतिम ठेच्याचा बाजरीच्या अथवा ज्वारीच्या भाकरीबरोबर आस्वाद घ्यावा. झुणका व कांदा  सोबत असल्यास दुग्धशर्करा योग समजून पाककर्त्यास (किंवा कर्तिस) मनोमन धन्यवाद द्यावा. .

No comments:

Post a Comment